पंढरपूर - दिनांक २२ मे २०२० रोजी सकाळी ११.०० ते ११.३० च्या दरम्यान भाजपाने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काळे झेंडे दाखवून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून निषेध व्यक्त करण्याचे ठरविले होते .

कोरोनाच्या या भयंकर संकटसमयी सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सरकारचे हात बळकट करायचे सोडून,भाजपाने त्यांचा राजकीय करंटे पणा दाखवण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही. भाजपाच्या मनात धुमसत असलेल्या सूड भावनेने त्यांना विरोधी पक्षाऐवजी 'महाराष्ट्र विरोधी' बनवून ठेवले आहे.

या महाराष्ट्र द्रोह्यांचे आंदोलन मोडून काढण्या साठी महाराष्ट्रावर प्रेम करणारी जनता, शेतकरी बांधव, शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले होते की,राज्य सरकारच्या समर्थनार्थ प्रतिआंदोलन करायचे त्याप्रमाणे भगवे झेंडे दाखवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकार यांना भगवा झेंडा पाठींबा दर्शवून विरोधी पक्षाला प्रतिउत्तर देताना शिवसेना पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे व शिवसैनिक .
 
Top