माजी आ.दीपक साळुंखे यांचा स्तुत्य कार्यक्रम

भाळवणी,(प्रशांत माळवदे)- लाँकडाऊन काळात मदतीचा हात म्हणून सोलापूर विधानपरिषदेचे माजी आ. दिपक साळुंखे यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने भाळवणी, (ता.पंढरपूर) येथे २०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. 

   कोरोनामुळे लॉकडॉउन असल्यामुळे मोलमजुरी करून खाणाऱ्या कुटूंबातील व्यक्तीचा रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगोला मतदार संघातील अशा लोकांना मदतीचा हात म्हणून साखर, पोहे, शेंगदाणे, तूर डाळ, मटकीची डाळ, एक तेल पुडा, मीठ, तिखट, व्हील साबण, संतूर साबण, चहा पावडर, मसाला, हळद  या वस्तूंचे पॅकेज देऊन त्या लोकांमध्ये एक मायेची ऊब निर्माण केली. 

    याठिकाणी माजी आ. दीपक साळुंखे यांनी गावातील सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन गोरगरीब व गरजू लोकांना वार्डनुसार या वस्तूचे वाटप केल्यामुळे लाभार्थी लोकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. 

   या जीवनाश्याक वस्तूचे सोशल डिस्टन्स ठेवून प्रत्येक वार्डात घरपोच करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार शिवाजीराव शिंदे, पंढरपूर कृषी उत्पन्न  बा समितीचे माजी सभापती भगवान चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, सरपंच जयश्री शिंदे, हरिभाऊ शिंदे, दीपक गवळी, शिवाजी गवळी, सुनिल पाटील, बापू देशपांडे, शशिकांत विभूतेे, दत्तात्रय लोखंडे,महेश इंगोले,रवि शिंगटे, सोनू पाटील आदि उपस्थित होते.
 
Top