खर्डी, (संतोष कांबळे)- माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी कारखान्याच्या वतीने दरवर्षी शेतकरी सभासदांना दिवाळी व गुढीपाडव्याला प्रत्येक सभासदाला ३० किलो प्रमाणे अल्पदरात साखर मिळते. परंतु या वर्षी मार्च महिन्यामध्ये पाडव्याची साखर वाटप होण्या अगोदरच देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे सभासदांना साखर देणे अडचणीचे होते त्यावर तोडगा काढत चेअरमन सुधाकरपंत परिचारक, आमदार प्रशांत परिचारक तसेच सर्व संचालक मंडळ व कारखान्याचे कार्यकारी अधिकारी यशवंत कुलकर्णी यांनी नियोजन करत सभासदांचे तोंड गोड केले .


  शेतकरी अडचणीत असताना प्रत्येक वेळी सभासद शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून खरी साथ देणारा सोलापूर जिल्ह्यातील एकमेव साखर कारखाना म्हणजे पांडुरंग सहकारी साखर कारखाना असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

   सध्याच्या कोरोनासारख्या महामारीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतसुद्धा पांडुरंग कारखान्याने शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम केले आहे.
सभासदांना घरपोच साखर तसेच कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक सभासदाला मोफत ५०० मिली सुपंत सॅनिटायझर वाटप करत सभासदांच्या कुटूंबाची काळजी घेण्याचे काम सुरू आहे.
सभासदांना घरपोच साखर व सॅनिटायझर मिळाल्यामुळे कारखान्याचे चेअरमन सुधाकरपंत परिचारक,आ.प्रशांत परिचारक,व्हाईस चेअरमन वसंत देशमुख ,कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी आणि संचालक मंडळ तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
 
Top