नातेपुते (श्रीकांत बाविस्कर) :-ज्ञानदीप को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि मुंबई यांचे वतीने covid19 कोरोना संकट संसर्ग टाळणे कामी ज्ञानदीप सोसायटीच्या माळशिरस शाखा,अकलूज शाखा व नातेपुते शाखा यांचेतर्फे सातारा /सोलापूर पोलिस चेक पोस्ट, शिंगणापूर पाटी पोलिस चेक नाका येथील पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांना संस्थेमार्फत पी.पी.ई कीट वाटप करणेत आले.covid 19 कोरोना संकट सामना करणेकामी सदरचा उपक्रम राबविण्यात आला. माळशिरस शाखा प्रमुख नागेश बोंद्रे, अकलूज शाखा प्रमुख दशरथ यादव व नातेपुते शाखा प्रमुख विजय अहिरेकर यांचेतर्फे पी.पी.ई कीट वाटप करणेत आले .


  यावेळी संस्थेचे अमोल ढमाळ,अमीत सोळसकर, रवींद्र जाधव, तुषार फडतरे, धनंजय क्षीरसागर, अक्षय मोहिते पाटील,भीमराव बर्गे,अशोक डोंबाळे नवनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.


 
Top