पंढरपूर - आज दिनांक २२ मे २०२० रोजी सकाळी ११.०० ते ११.३० च्या दरम्यान भाजपाने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काळे झेंडे दाखवून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून निषेध व्यक्त करण्याचे ठरविले आहे.

   कोरोनाच्या या भयंकर संकटसमयी सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सरकारचे हात बळकट करायचे सोडून,भाजपाने त्यांचा राजकीय करंटे पणा दाखवण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही. भाजपाच्या मनात धुमसत असलेल्या सूड भावनेने त्यांना विरोधी पक्षाऐवजी 'महाराष्ट्र विरोधी' बनवून ठेवले आहे.


 आज दिनांक २२ मे रोजी सकाळी ११.० पासून  प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत, आपल्या घराच्या गॅलरीत, गच्चीवर, शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर किंवा अंगणात शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा झेंडा धरून किंवा भगवा झेंडा नसल्यास भगवा रुमाल, भगवा फेटा, भगवी फीत किंवा भगवी ओढणी घेऊन आपल्या कुटुंबासमवेत फोटो काढून तो फेसबुक, व्हाट्सअँप व ट्विटर वर टाकूया आणि महाराष्ट्र सरकारला आपला भरघोस पाठिंबा दर्शवू या ,असे आवाहन शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी केले आहे.
  या महाराष्ट्र द्रोह्यांचे आंदोलन मोडून काढण्या साठी महाराष्ट्रावर प्रेम करणारी जनता, शेतकरी बांधव, शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले की, राज्य सरकारच्या समर्थनार्थ प्रतिआंदोलन करायचे आहे. 
वास्तविक कोरोनाच्या संकटामुळे देश अडचणीत आला आहे . त्यामुळे कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मग ते केंद्रात असो अथवा राज्यात असो सर्वांनी एकत्र येऊन जनतेला दिलासा देण्याचा आणि देशाला संकटातून मार्ग काढण्याचा ही वेळ आहे काम करणाऱ्या व्यक्ती समूहांना पाठबळ देण्याचे काम सत्ताधारी व विरोधी पक्षांनी करणे गरजेचे आहे .काम करणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी असतील किंवा सामाजिक संस्था असतील व्यक्तिगत पातळीवरही कोणी मदत करत असेल तर त्यांना पाठबळ देऊन या कोरानातून मुक्ती मिळवणे हा एकच उद्देश पाहिजे.
    आज दिनांक २२ मे रोजी सकाळी ११.०० ते ११.३०च्या दरम्यान प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत,आपल्या घराच्या गॅलरीत, गच्ची वर, शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर किंवा अंगणात शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा झेंडा धरून किंवा भगवा झेंडा नसल्यास भगवा रुमाल, भगवा फेटा, भगवी फीत किंवा भगवी ओढणी घेऊन आपल्या कुटुंबासमवेत फोटो काढून तो फेसबुक, व्हाट्सअप्प व ट्विटर वर टाका आणि महाराष्ट्र सरकारला आपला पाठिंबा दर्शवा असे आवाहन प्रा.शिवाजीराव सावंत,शिवसेना सोलापूर जिल्हा समन्वयक  , संभाजीर शिंदे ,शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग,आमदार शहाजीबापू पाटील, सांगोला विधानसभा मतदारसंघ,साईनाथ अभंगराव ,शिवसेना मा.जिल्हा प्रमुख,सौ.शैलाताई गोडसे,शिवसेना सोलापूर जिल्हा महिला आघाडी जिल्हा संघटक,स्वप्नील वाघमारे,युवा सेना जिल्हा युवा अधिकारी सोलापूर जिल्हा पंढरपूर विभाग,
दत्तात्रय पवार,शिवसेना उप-जिल्हाप्रमुख माळशिरस,सुधीर (भाऊ) अभंगराव,शिवसेना उपजिल्हाप्रमुख पंढरपूर ,महावीर देशमुख
शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख, सूर्यकांत घाडगे ,शिवसेना सांगोला तालुका प्रमुख,नामदेव वाघमारे,शिवसेना माळशिरस तालुका प्रमुख,रविंद्र मुळे,शिवसेना पंढरपूर शहर प्रमुख,कमरुद्दीन खतीब ,शिवसेना सांगोला शहर प्रमुख,अजित गांधी,शिवसेना अकलूज शहर प्रमुख यांनी केले आहे. 


 
Top