करमाळा :"कंदर सारख्या ठिकाणी निर्यात प्रधान केळी लागवड , प्रक्रीया व निर्यात या क्षेत्रात मोठे काम उभा करणारे किरण डोके यांची केंद्रीय सरकारी अपेडा या संस्थेद्वारे राष्ट्रीयस्तरावर केळी एक्सपोर्ट फोरम स्थापित केला असून कंदर येथील केळी पिकविणारे शेतकरी व निर्यातदार किरण नवनाथ डोके यांची सदस्य म्हणून झालेली निवड ही येथील सर्व घटकांचे श्रम व सहभाग प्रमाणित व सन्मानीत झाले आहेत त्याचं प्रमाणांत त्यांनी या दीड महिन्यांत सुमारे दोन हजार टन केळी निर्यात केली आहेत .सर्व केळी उत्पादक यांचा हा सन्मान आहे ." असं जेष्ठ मार्गदर्शक कृषीरत्न आनंद कोठडीया म्हणाले .ते लोकविकास व कृषी परिवार द्वारे किरण डोके यांचा सत्कार करतांना बोलत होते .
  

  राजू शेठ गादीया ,माजी सरपंच जेऊर , श्री .व सौ.आनंद कोठडीया हे उपस्थित होते .

यावेळी बोलतांना किरण डोके म्हणाले, माझ्या  यशस्वी वाटचालीत गूरूवर्य कृषीरत्न आनंद कोठडीया, माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट, नँचुरल शुगरचे कृषीरत्न बी.बी. ठोंबरे तसेंच केळी उत्पादक शेतकरी,कृषी विभाग ,महाराष्ट्र शासन सर्व अधिकारी व संलग्न सर्व घटक यांचा सिंहाचा वाटा आहे .
 
Top