*गोमंतकातील जनतेवर ‘इन्क्विझिशन’च्या नावे मिशनर्‍यांनी केलेल्या अत्याचारांची माहिती देणार्‍या ‘ऑनलाईन चित्रप्रदर्शना’चे लोकार्पण होणार !*

पोर्तुगिजांच्या तावडीतून गोवा राज्य मुक्त होण्यास वर्ष १९६१ उजडावे लागले. तब्बल ४५० वर्षांनी गोवा पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त झाला; मात्र या कालावधीत गोव्यातील हिंदूंनी जे अत्याचार सहन केले, ते भारतियांना फारसे माहीतच नाहीत. पोर्तुगिजांच्या क्रूर राजवटीमध्ये मिशनर्‍यांकडून राजाज्ञा मिळवून ‘इन्क्विझिशन’ म्हणजे धर्मसमीक्षण सभेच्या नावे गोव्यातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करून ख्रिस्ती बनवले गेले, मंदिरे पाडण्यात आली, मूर्ती बनवण्यावर बंदी लादण्यात आली, अंगणात तुळस लावण्यास मनाई करण्यात आली, शेंडीवर कर लावण्यात आला, तसेच स्त्रियांना गुलाम बनवण्यात आले. इतक्या प्रचंड प्रमाणात अत्याचार करण्यात येऊनही हा इतिहास कोणत्याही पाठ्यपुस्तकात दिला जात नाही. एके काळी परशुरामभूमी असणार्‍या गोमंतकाची ओळख आज ‘गोवा म्हणजे चंगळवादाची भूमी’, अशी बनली आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेवरील क्रूर अत्याचारांचा तसेच त्यांच्या संघर्षाचा, स्वाभिमानाचा इतिहास जनतेसमोर आणण्यासाठी प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी एका प्रदर्शनाची निर्मिती केली आहे.


हे प्रदर्शन www.goainquisition.info या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

फ्रान्सुआ गोतिए यांच्या ‘FACT’ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करण्यात येत आहे. या कार्यक्रमात फ्रान्सुआ गोतिए यांचीही विशेष उपस्थिती असेल. तसेच गोवामुक्तीच्या लढ्यातील क्रांतीकारक प्रभाकर वैद्य यांची कन्या आणि लेखिका शेफाली वैद्य, गोव्यातील प्रसिद्ध इतिहासतज्ञ प्रा.प्रजल साखरदांडे आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचाही सहभाग या कार्यक्रमात असणार आहे. या ऑनलाईन प्रदर्शनाचे उद्घाटन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते होईल.


या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रसारण यू-ट्यूबच्या Youtube.com/HinduJagruti या चॅनेलद्वारे, तसेच फेसबूकच्या ‘Facebook.com /HinduAdhiveshan’ आणि ट्विटरच्या ‘Twitter.com/HinduJagrutiOrg’ या सोशल मिडीयावरून ३० मे रोजी सायं.७ वाजता केले जाणार असल्याने गोमंतकियांसह समस्त भारतियांनी तो आवर्जून पहावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्यावतीने राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले आहे.
 
Top