जीचे ह्रदयच खरं तर विश्वातील
शक्तिमान केंद्र आहे
जिथे प्रेम आशीर्वाद कृपा यांचं अमृत निर्माण होत
अन खळखळा सदैव वाहत असतं
जिथे सदैव क्षमा केली जाते
जिथे इतरांच्या वेदना व्यथा दुःख 
मान अपमान स्वीकृत करत फक्त 
प्रेमळ सेवा दिली जाते 
जिथे सदैव मायेची सावली नांदते 
तीच तर आई असते 
तिची थोरवी शब्दात का सीमित करता येते ?
खरं तर आई ही आईच असते 
तिला कुठेच उपमा का असते ?
म्हणूनच आई हीच 
जीवन विद्यापीठाची प्रथम कुलगुरू असते
तिला निवृत्ती कुठे असते ?"!!


आनंद कोठडीया , जेऊर ता. करमाळा 
९४०४६९२२००
 
Top