पंढरपूर - आज दिनांक २४ मे २०२० रोजी पंढरपूर तालुक्यातील उपरी गावांमध्ये कोरोनाचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे तो ३ कि.मी. परिसर सील केला असून या गावांत प्रशासनाच्या माध्यमातून तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांच्या मार्गदर्शना खाली कंटेनमेंट एरियातील नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद आणि होमिओपॅथी चा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक वेगळाच अभिनव प्रकल्प राज्यांमध्ये प्रथमच राबविण्यात येत आहे. या प्रयोगांमध्ये गावातील सर्व कुटुंबांचा सर्वे करण्यात आलेला असून यातील ज्या व्यक्तीचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आणि त्यांना डायबिटीज,कँसर यासारखे गंभीर आजार आहेेत त्यांना आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आयुर्वेदिक काढा ज्यामध्ये वेगवेगळ्या वनौषधींचा समावेश असून त्याचा वापर श्वसन संबंधातील आजारांचे विरोधामध्ये तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता केला जाणार आहे. त्याकरता डॉ.आबासाहेब रणदिवे यांनी त्याबाबत मार्गदर्शन व सहकार्य केलं .या गावातील दीडशे लोकांवरती ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे त्यांना हा काढा दिला जाणार आहे. त्याचबरोबर आयुष मंत्रालया नुसार डॉ संगीता पाटील यांचे मार्गदर्शनखाली होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम थर्टी या गोळ्या देखील ५०० व्यक्तींना ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त व दहा वर्षाखालील बालके यांना त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गोळ्या देण्यात आलेल्या आहेत.


गावांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून गावातील सार्वजनिक ठिकाणं सोडियम हायपो क्लोराईडचा वापर करून निर्जंतुकीकरण करण्यात आली आहेत. रुग्णाच्या संपर्क मधील high risk contact व्यक्तीना वाखरी येथील सेंटरमध्ये त्यांना संस्थात्मक अलगीकरण केलेले आहे व लो रिस्क कॉन्टॅक्ट जे आहेत त्यांना गावा तील माध्यमिक विद्यालयामध्ये स्वतंत्र ठेवण्यात आले असून त्यावर देखील प्रशासन लक्ष ठेवून आहे .
  
      सदर कार्यक्रमाच्या वेळी तालुका गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले , ग्रामीणचे पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, डॉ संगीता पाटील, डॉ आबासाहेब रणदिवे,डॉ तांबोळी मॅडम,ग्रामसेवक, तलाठी ,आरोग्य सेवक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
 
Top