पंढरपूर,दि१७/०५/२०२०- कोरोना लॉकडाउन मुळे सर्व व्यवहार बंद असल्यामुळे अडचणीत सापडलेल्या पंढरपूरातील गरजू समाज बांधवांना कासार विचार मंचच्यावतीने पंढरपूरातील कासार विचार मंच संचालित वारकरी भवन येथे कासार विचार मंचचे उपाध्यक्ष बाळकृष्ण मोहोळकर फलटण यांच्या हस्ते १४ वस्तू असणारे किराणा ३० संच वाटप करण्यात आले.


या वेळी कासार विचार मंचचे पंढरपूर शहराध्यक्ष अविनाश मांगले, उपाध्यक्ष व लाभार्थी समाज बांधव भगिनी उपस्थित होते.या शिधा वाटपासाठी कासार विचार मंचचे बाळासाहेब कासार,सचिव कालिदास अष्टेकर औरंगाबाद,संचालक प्रा.अशोक डोळ, अनिल कंदले गुरुजी ,गोपाळ गाडे,पंढरपूर तसेच फलटण कासार समाज बांधव यांचे आर्थिक योगदान लाभले आहे .या व्यतिरिक्त गरजू समाजबांधवाना कासार विचार मंचच्यावतीने सहकार्य केले जाईल असे उपाध्यक्ष बाळासाहेब कासार यांच्यावतीने सांगण्यात आले. 


   या संकट समयी कासार विचार मंचने केलेल्या मदतीबद्दल दत्तात्रय खुटाळे,रवी काटकर ,सागर झरकर यांनी लाभार्थींच्यावतीने समाधान व्यक्त केले.


 
Top