पंढरपूर , प्रतिनिधी- भारतासह जगभरात कोरोनाने जे थैमान घातलेले आहे.पंढरपूर मध्येही गेली दोन महीने लाँकडाऊन पाळण्यात आलेला आहे. त्यामुळे पंढरपूरात काही हॉटेल कामगार तसेच वारकरी व काही व्यक्ती हे मठात,पंढरपूर बस स्टँड,प्रदक्षणा रोड येथे अडकलेले आहेत . जेव्हा बंदची हाक दिली तेव्हापासून आम्ही पंढरपूरकर फाउंडेशन यांच्याकडून अन्न वाटप करण्यात येत आहेच तसेच त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यात आलेली आहे.आज रोजी गंगागिरी महाराज मठ येथे अडकलेल्या कामगारांना आम्ही पंढरपूरकर फाउंडेशन यांच्याकडून टी-शर्ट देण्यात आले आहेत.


या वेळेस आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष सागर कदम,उपाध्यक्ष सतीश माने, सचिव ओंकार चव्हाण,बाळासाहेब गोडबोले,गणेश थिटे, शेखर भोसले,निलेश गंगथडे,सोपान काका देशमुख,गणेश निंबाळकर,आनंद कथले सर यांचे सह कार्यकर्तेही उपस्थित होते.


 
Top