नातेपुते (श्रीकांत बाविस्कर) : सोलापूर जिल्ह्यात  कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्या साठी पुणे पंढरपूर रोडवरील सोलापूर जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणारे धर्मपुरी येथे धर्मपुरी ग्राम पंचायतच्यावतीने जिल्हा प्रवेश चेक पोस्टवर थर्मल स्कॅनिंग मशीनद्वारे अत्यावश्यक सेवेतील जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या लोकांची तपासणी २७ एप्रिल पासून चालू केली असून त्याचा शुभारंभ मोरोची प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय मेहता यांच्या हस्ते करण्यात आला.
  

      यावेळी धर्मपुरीचे सरपंच बाजीराव काटकर, ग्रामसेवक बीएस गोरे, बापूराव पाटोळे, मोहन मोरे, हनुमंत मसुगडे, गणेश भोकरे, सचिन पाटील, राजेंद्र माने, जावेद शेख, आरोग्य सेवक चंदू सुळ,  पोलिस विभागाचे पोपट पानसकर, हनुमंत लोंढे बाळू खांडेकर, मगर उपस्थित होते जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील चेक पोस्टवर पर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनातील प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग द्वारे तपासणी करण्यात येत असून तपासणी केलेल्या प्रत्येकाचा मोबाईल नंबर, आधार नंबर घेतला जात आहे  तपासणी केल्यानंतर एखाद्या व्यक्तीस ताप जास्त असल्यास मोरोची प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा उपजिल्हा रुग्णालयात सदर व्यक्तीला पाठविण्यात येणार असून सदर ठिकाणी त्याची पुढील तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉक्टर अभय मेहता यांनी यावेळी सांगितले 


         धर्मपुरीचे सरपंच बाजीराव काटकर यांनी आरोग्य उपकेंद्र धर्मपुरी यांनाही ग्रामपंचायत मार्फत थर्मल स्कॅन मशिन दिले असून या मशीन द्वारे दक्षता म्हणून धर्मपुरी गावातील नागरिकांचे धर्मपुरी आरोग्य उपकेंद्रामार्फत तापमान तपासणी करण्यात येणार असल्याचे सरपंच बाजीराव काटकर यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षेचे नियम पाळूया असे आवाहन केले आहे. 
 
Top