यामध्ये करकंब भोसे गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष राजुबापु पाटील यांचे आवाहना नुसार भोसे गाव दोन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधी ग्रामस्थांना सुचना देण्यात आल्या आहेत.
भोसे गावानजिक असलेल्या करकंब या ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने आपल्या गावात कोरोना विषाणूचा शिरकाव होवू नये. कोरोना विषाणूपासून गावाचे संरक्षण व्हावे म्हणून राजुबापु पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोरोना जनजागृती समितीच्यावतीने काही कठोर निर्णय घेण्यात आले असून यामध्ये शुक्रवार दि.२९ मे ते शनिवार दि.३० मे २०२० दरम्यान गावातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात फक्त दुध उत्पादकांसाठी सवलत देण्यात आली असूनदूध उत्पादकांनी स.६ ते ७ व सायं.७ ते ८ या वेळेतच दूध संकलन करावे.
दि.२९ ते ३० दरम्यान गावातील किराणा व बाकीचे सर्व दुकाने पूर्णवेळ बंद ठेवण्यात यावीत.
गावातील सर्व मेडीकल या दोन्ही दिवशी पूर्ण वेळ बंद राहणार आहेत.जर अत्यावश्यक असेल तर ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांनी संपर्क साधावा, आपणास औषध देण्याची व्यवस्था करण्यात आली असून दि.२९ ते ३० दरम्यान गावात भाजीपाला विक्रीसुध्दा करण्यात येणार नाही. वाहनधारकांनी गाव सोडून बाहेर जाऊ नये.गावात विनाकारण मोटारसायकल वरून फिरू नये व बाहेरील लोकांनाही गावात येऊ देऊ नये. तसे आढळल्यास कारवाई करण्यात येईल.कोणीही ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये.सर्व ग्रामस्थांनी सुचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे.अशा सुचना कोरोना ग्रामस्तरीय समितीच्या वतिने देण्यात आल्या आहेत.