पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर नगर परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. पंढरपूरातील सर्व नागरिक, दुकानदार , कर्मचारी, भाजीपाला विक्रेत्यांचे थर्मल स्क्रीनिंग द्वारे तपासणी करण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य कर्मचारी,आशा कर्मचारी, नर्सीग स्टाफ यांच्या मदतीने नगरपरिषद प्रतिनीधी करत असतात .
नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बजरंग धोत्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ सालविठ्ठल यांच्या हस्ते वॉशेबल पिपीई किट, सॅनिटायझर देण्यात आले.
सदर प्रसंगी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सर्व कर्मचार्यांनी आजपर्यंत केलेल्या कामा बद्दल समधान व्यक्त केले. पुढील दिवसाचे नियोजन सांगितले.
नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी कर्मचारींना नगरपरिषदेच्यावतीने सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येतील व नागरिकांच्या सहभागाने कोरोनाची लढाई जिंकायची आहे असे सांगितले.
आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी सर्व कर्मचार्यांना सांगितले, पुढे आपणास नवनवीन संकटांचा सामना करावा लागू शकतो, अशा संकाटातून नागरिकांना वाचवण्याची जबाबदारी आपली असून, नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे लागेल, आम्ही ही तुमच्या मदतीला आहोत , ग्रांउड लेव्हलला आम्ही काम करणार आहोत. आपण सर्वजण मिळुन नागरिकांच्या सहभागाने आपल्या गावाला सुरक्षीत ठेवायचे आहे .