पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर अंतर्गत दिनदयाळ अत्योंदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान या योजनेमधून CPWD गोपाळपूर रोड येथे शहरामधील निराश्रित लोंकासाठी माऊली बेघर निवारा सुरू केलेला आहे.सदर निवा-या मध्ये असणा-या लाभार्थीसाठी कॉट,गादी,बेडशीट, चादरी व स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

      निवार्यातील लाभार्थीना वेळेवर चहा,नाष्टा व दोन वेळचे जेवन देणेत येत आहे दि २२-०३- २०२०पासुन कोव्हिड १९ या साथरोगामुळे लॉकडॉऊनमध्ये जवळपास १७७ लोक सदर ठिकाणी वास्तव करित होते. त्या कालावधी मध्ये माऊली बेघर निवारा मध्ये दि २२-०३-२०२० ते आज पर्यत श्री विठ्ठल रूक्मिनी मंदिर समिती व इस्कॉन मंदिर यांचा सकाळी नाष्टा आणि कोळी महासंघ उपाध्याक्ष अरूणभाऊ कोळी यांचे रोज संध्याकाळी एक वेळचे जेवण सर्व लोंकाना पुरविण्यात येत आहे तसेच नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले, महावीर जयंती निमित्त शहरातीमधील जैन बांधव, पंढरपुर शहर डॉक्टर्स असोसिएशन, माणुसकी समाजसेवा संस्था,राष्टीय स्वंयसेवक संघ, साईबाबा संस्था, महेश तेंडुलकर, रोटरी क्लब पंढरपुर, संजय शांतीलाल शहा, कौस्तुभ ट्रेडिंग कंपनी , सुभाष मर्दा , दिपक चंदनशिवे, शिवाजी कोरे , पोलिस निरिक्षक पंढरपूर, डॉ.श्रीकांत खटावकर व संजिव खपाले, शाम पवार,बागवान मुहल्ला,न्यु बागवान मुहल्ला, अमित गायकवाड कृष्णा चौंडी,योगेश डोंगरे, शिवाजी कोळी,सुजितकुमार सर्वगोड,विठाई बहुऊद्देशिय संस्था, इब्राहिम बोहरी,अश्विनी महाराज मनमाडकर यांचे मार्फत गहु,तांदुळ व किराणा साहित्य,भाजीपाला व फळे  देण्यात आली आहेत.

     वरिल सर्व मान्यवर व्यक्तिनी केलेल्या सहकार्या बद्दल नगराध्याक्षा सौ साधनाताई भोसले,नगर परिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व  सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांचे वतीने आभार मानण्यात आले आहेत.

वास्तविक पंढरपूरकरांच्या आणि प्रशासकीय यंत्रणेच्या सर्व स्तरातून प्रामाणिकपणे केलेल्या कार्यामुळे पंढरपूरात कोरोनाचा प्रवेश झालेला नाही मात्र आता पंढरपूरकरांची परिक्षा आहे. कोरोनाला आत घ्यायचे का बाहेरच थोपवायचे. प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या कार्यात कोठेही कमी पडलेली नाही.

प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे,तहसिलदार डॉ वैशाली वाघमारे,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, आरोग्य विभागाचे सभापती विवेक परदेशी,नगरपरिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ बजरंग धोत्रे,शहर पोलिस निरीक्षक अरुण पवार,  पोलिस निरीक्षक किरण अवचर,पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे,पंचायत समिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके तसेच पंढरपुरातील सर्व सामाजिक संघटना त्यांचे पदाधिकारी ज्यात अरूणभाऊ कोळी, संदीप माने, संदीप मांडवे, सागर कदम,दिलीप धोत्रे,नागेश भोसले,दत्ता काळे महाराज,सोपानकाका देशमुख,राँबिनहुड यंग ब्रीगेडचे सर्व सहकारी,दिपक चंदनशिवे,संतोष कसबे,छत्रपती शिवाजी महाराज चौक तरूण मंडळ,महावीर युवा सेना, जैन सोशल ग्रुप, सन्मती सेवा दल तसेच सर्व समाजातील संघटनांनी तसेच विविध राजकीय पक्षांनी एकदिलाने काम केले असून असाच एकोपा टिकवून कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.कारण आताच कोरोना संकटाचा परिणाम दिसू लागला आहे. कोणाच्या ही चुका न काढता आता आपल्याला फक्त कोरोनाला हरवायचे आहे.      
 
Top