पंढरपूर, (प्रतिनिधी)- टाळेबंदीमध्ये विस्कळीत झालेली घडी पुर्ववत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयानुसार पंढरपूर येथील सर्व दुकाने,आस्थापने सामाजिक अंतर ठेवत सुरु करण्याची आग्रही मागणी आमदार भारत भालके यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचेकडे केली त्याची दखल घेवून सर्व अस्थापने सूरु करण्याचे आदेश प्रशासनाला प्राप्त झालेले आहेत असे पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी सांगितल्याची माहिती राष्ट्रवादीचे संदिप मांडवे यांनी दिली आहे.
पंढरपूर शहरातील दुकाने अ,ब,क,ड पद्धतीने सुरु करण्याचे नियोजन पंढरपूर नगरपालिकेने केले आहे. मात्र यात व्यापाराची साखळी खंडीत होत असल्याने व्यापारी वर्गात असंतोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभुमीवर अनुषंगिक मंत्री मंडळ बैठकीतील चर्चा व निर्णय महत्वपूर्ण आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील शासन निर्णयानुसार सर्व आस्थापने सुरु ठेवण्याचे आवाहन पंढरपूर - मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांनी केल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदिप मांडवे यांनी दिली असून, सामाजिक अंतर ठेवून, विशिष्ट वेळेत, आरोग्याची काळजी घेत व्यापारी वर्गाने दुकाने चालू ठेवा़वीत.काही अडचणी आल्या तर माझ्याशी ९८२२०१४३९९ वर संपर्क साधावा असे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले आहे.

 पंढरपूर-मंगळवेढा शहरात सर्व दुकाने,रिक्षा, टांगा, फेरीवाले, हातगाडे,केशकर्तनालये इ. आस्थापने दिनांक २२ मे पासून सर्व नियमांचे तंतोतंत पालन करुन सुरु होणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या सुचनेनुसार आमदार भारत भालके यांनी जाहिर केले असल्याचे सांगितले आहे .
 
Top