मुंबई -राज्य सरकार सर्व स्तरावर प्रयत्नांची  शिकस्त करतेय.कोरोना या आजाराबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार एकत्र काम करत असून अद्याप GST चे पैसे केंद्राने दिले नाहीत ,ते त्यांनी त्वरित द्यावेत.केंद्र सरकारने जे पँकेज जाहीर झाले केले ते ४० दिवसांनी आणि अजूनही त्याच्या Guide lines आलेल्या नाहीत.

  या उलट आरोग्य व जीवनाश्यक सुविधांचा मेळ राज्य सरकारने घातला.केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांचा विचार २१ मार्चला केला असता वा १मे ला काही धोरण व पाऊले ऊचलली असती तर आता जी मजुरांची दैना झाली ती झाली नसती.

   कधीही आपत्ती व्यवस्थापन कायदा देशभरात लागू झाल्यावरती आपत्ती व्यवस्थापन धोरण व आराखडा जाहिर केला जातो तोही आतापर्यंत जाहीर केला गेलेला नाही.

   त्यामुळे भाजपा हा राजकीय नैराश्यातुन आपत्तीचे राजकारण करुन लोकांच्या प्रश्नावर स्वत:ची पोळी भाजुन घ्यायचा प्रयत्न करत आहे असे आ.नीलम गोर्हे प्रवक्ता शिवसेना यांनी भाजप च्या आजच्या आंदोलनाचा समाचार घेताना सांगितले. 
 
Top