पंढरपूर,(नागेश आदापुरे)-दि पंढरपूर मर्चंटस को आँप बॅंकेचे मार्केट यार्ड शाखेचे मॅनेजर दत्तात्रेय देवीदास भिंगे सेवानिवृत्त झाल्याबद्दल शाखेच्या वतीने बॅंकेमध्ये दत्तात्रेय भिंगे यांचा सत्कार करण्यात आला.


बॅंकेचे माजी व्हा चेअरमन हुसेन पटवेकरी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.


   यावेळी डि सी सी बॅंकेचे विलास पोरे,मर्चंट बॅंकेचे रमेश नवाळे , संतोष म्हमाणे, अतुल शेठ, सतीश यादव,संजय परचंडराव,सुधीर पांढरे आदी उपस्थित होते.सर्वांनी दत्तात्रेय भिंगे यांंच्या  कार्याचे कौतुक केले व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या. 


सत्काराला उत्तर देताना दत्तात्रेय भिंगे यांंनी सर्वांचे आभार मानले .यावेळी सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात आले होते.  
 
Top