पंढरपूर,प्रतिनिधी दि.१७/०५/२०२०- देशभरामध्ये व राज्यामध्ये सध्या मोठया प्रमाणात पसरलेल्या कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर यशवंत सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.वसंतनगर पंढरपूर व जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने शासनाचे आवाहनास प्रतिसाद देत शासनाने घालुने दिलेल्या Social Distansing नियम व अटीचे काटेकोर पालन करत सोसायटी मध्ये रक्तदान शिबीरात ४५ नागरीकांनी रक्तदान केले. 

पंढरपूर येथील यशवंत सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.वसंतनगर पंढरपूर व जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर, पंढरपूर ब्लड बँक पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरात सोसायटीतील सभासद व नागरीकांनी प्रतिसाद देवून रक्तदान केले यामध्ये महिलांनीही रक्तदान करुन उत्सुफुर्त प्रतिसाद नोंदविला.रक्तदान शिबीरात रक्तदात्यास मास्क व सॕनिटायझरची बोटल यांचे वाटप करण्यात आले तसेच कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सोशल डिस्टनिंगचे महत्व सांगण्यात आले. 

  कोरोना आजाराचा शिरकाव आपल्या गावात, घरात, कुटुंबात होवू न देणेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या,पोलिस प्रशासन व आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. घरीच राहणे आणि स्वत: खबरदारी घेणे हा एकमेव उपाय कोरोनावर मात करण्यासाठी असून सर्वांनी त्याचे पालन करावे असे संस्थेचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले.  

 सदर शिबीराचे उद्घाटन प्रसंगी यशवंत गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन कल्याणराव काळे, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, वसंत दादा मेडीकल फाउंडेशनच्या अध्यक्षा संगिता काळे, सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या संचालिका मालनबाई काळे, पंढरपूर ब्लड बँकेचे डॉ.प्रसाद खाडीलकर,डॉ.सुधीर शिनगारे, गृह निर्माण संस्थेचे उपाध्यक्ष यशवंत पवार, सचिव सुधीर साळूंखे,सदस्य महादेव शिंदे,हेमंत कासार, गणेश सुतार,तुकाराम सोनवणे, नारायण गावडे, सुहास पाटील, आण्णासाहेब गाजरे, रविराज सोनार, महेश सोनवणे, संजय कांबळे, सोनु सोनवणे, ऋषीकेश शिंदे,महेश कदम आदी उपस्थित होते.  
 
Top