पंढरपूर -सांगोला रस्त्यावरील स्वतःचे राहते घर क्वारंटाईन करण्यासाठी आमदार भारत भालके यांनी देण्याची तयारी दाखविली आहे.त्यांनी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे बंगला देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 

 पुणे, मुंबईसह इतर राज्यातून आतापर्यंत सुमारे सात हजारांहून अधिक लोक शहर व तालुक्‍यात आले आहेत. नगरपालिका प्रशासनाने शहरातील धर्मशाळा आणि मठामध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण केले आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहाता आमदार भारत भालके यांनी आपला राहाता बंगला क्वारंटाईन करण्यासाठी  खाली करून देणार असल्याचे जाहीर केले,कारण पंढरपूर शहराची सुमारे सव्वा लाख लोकसंख्या असताना एकही नव्हता मात्र बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे शहरात कोरोना बाधित रूग्ण संख्या वाढू लागली आहे.

क्वारंटाईन करण्यासाठी लागणारे सर्व साधन सामुग्रीही उपलब्ध करून देणार असून याठिकाणी अधिकारी ,कर्मचारी यांचीदेखील सोय केली जाईल असे आमदार भारत भालके यांनी सांगितले.
 
  आमदार भालके यांनी पंढरपूर शहर व तालुक्‍या तील आरोग्य केंद्रासाठी सुमारे २५ लाख रूपयांचा निधी दिला आहे. या निधीमधून मास्क,पीपीई कीट,सॅनिटायझरसह आवश्‍यक वैद्यकीय साधने खरेदी करण्यात आली आहे. 
 
Top