‌‌

मुंबई - परराज्यातील अनेकजण उपजीविकेचे साधन शोधण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. त्यातल्या त्यात मुंबई येथे परप्रांतीयांचे प्रमाण जास्त असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना त्यांच्या गावी परत पाठविण्यात येत आहे .मात्र मध्यंतरी गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जो गोंधळ झाला त्यामुळे त्यांना परत पाठवण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे होते. यासाठी मुुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कु.प्रियांका पितांबर भोसले ह्या महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात अन्य राज्यातून स्थलांतरित झालेल्या कामगार व इतर व्यक्तिंना कोरोनाच्या सद्यस्थितीत व त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवण्याबाबतचे नियोजन करत आहेत.आपल्या सर्व सहकारी यांच्यासह रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत.


मुुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कु.प्रियांका पितांबर भोसले ह्या सोलापूर जिल्ह्या तील सरकोली गावातील असून वडिल पीतांबर भोसले मंत्रालयात उच्चपदी कार्यरत असून आई सौ पूनम पीतांबर भोसले ह्या मुंबई हायकोर्टात अँडव्होकेट आहेत .
 
Top