पंढरपूर - कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन काळात शहरातील सुमारे २५० भिकारी,निराधार व काही नागरिक यांना पंढरपूर नगरपरिषदच्या माऊली निवारा निराधार केंद्र येथे ठेवण्यात आले होते . गेले एक महिना झाले शहरा तील सामाजिक संघटना व नगरपरिषदचेवतीने त्यांना दोनवेळा जेवण दिले जात होते .सगळ्या सुविधा देण्यात येत होत्या. 


  काल शासनाने अशा अडकलेल्या लोकांना त्यांचे गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. याबाबत काल उपविभागीय अधिकारी तथा इंनसीडेंट कमांडर सचिन ढोले यांचेशी चर्चा होऊन त्यांनी भालचंद्र चव्हाण ,आशा काळे,अंबादास राऊत (सोलापुर),अजित रजपूत (मंगळवेढा),चंद्रकांत लांडगे,प्रविण धनवडे,नामदेव सरतापे,दीपक बेडगे (सांगोला)मोहन काटकर,ओंकार धानेगावकर, धन्यकुमार वास्ते, भगवान चव्हाण (बार्शी), रावसाहेब माने, भारत नाईकनवरे या लोकांना त्याचे गावी जाण्यास परवानगी दिली पण त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे आवश्यक होते.

      यावर प्रांताधिकारी सचिन ढोले, नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी आमदार प्रशांत परिचारक व उमेश परिचारक यांचेशी चर्चा करून कॉलेजच्या बसची मागणी केली. त्यावर आमदार प्रशांत परिचारक यांनी कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेजच्या बस डिझेलसह उपलब्ध करून दिल्या.आज मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर ,निवारा केंद्राचे समुह संघटक संतोष कसबे ,मुबारक शेख,माजी नगरसेवक इब्राहिम बोहरी यांनी वरील १४ लोकांना त्यांचे गावी या बसच्या माध्यमातून सुरक्षित पाठवून दिले. 

    जाताना सदर निराधार व्यक्तींनी नगरपरिषद व सामाजिक संघटना यांनी गेले एक महिना आम्हास घरच्यापेक्षा जास्त काळजी घेऊन सांभाळले व सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल ऋण व्यक्त केले .तसेच ज्या व्यक्ती जिल्ह्याबाहेरचे आहेत अशा व्यक्तींना सुद्धा येत्या २ दिवसात त्यांचे गावी पाठविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली. 
 
Top