पंढरपूर ,(विजय काळे)- रमजानच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेच्या अध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांनी दोन निर्णयात बदल केले आहेत.यामध्ये उदईक रविवार दि.२४ मे रोजी होणारा जनता कर्फ्यु आणि शहरात एक दिवसा आड करण्यात आलेले पाणी.

या संदर्भात आमच्या प्रतिनिधीशी बोलताना, नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले म्हणाल्या की, रमजान सणामुळे उद्या रविवारचा जनता कर्फ्यु मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील रविवार दि.३१ रोजी जनता कर्फ्युची अमंल बजावणी करण्यात येणार आहे.तसेच संपूर्ण शहरात रविवारी आणि सोमवारी नियमितपणे पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगून मंगळवार दि.२६ पासून एक दिवसाड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे,असे नगराध्यक्षा सौ.भोसले यांनी सांगितले .

  तसेच सर्व मुस्लीम बांधवांना रमजान सणाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत .
 
Top