नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर)-सध्या कोरोना या भयंकर विषाणूने थैमान घातले असून अशा परिस्थितीत नातेपुतेमध्ये डॉक्टर्स , पोलीस कर्मचारी तसेच गरजू लोकांना अन्नद्रव्ये पुरवणारे कार्यकर्ते अहोरात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत.असे असताना ह्या सर्वांचे आरोग्य चांगले राहावे, निरोगी राहावे, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी एक सामाजिक जबाबदारी म्हणून आरोग्य मंत्रालय आयुष्य मंत्रालयाने प्रमाणित केलेले होमिओपॅथिक रोग-प्रतिकार शक्तिवर्धक औषध अर्सेनिक अल्बम ३० हे औषध नातेपुते मेडिकल असोसिएशनच्या वतीने सर्व पोलीस कर्मचारी व घरोघरी अन्नाचे डबे वाटप करणारे कार्यकर्ते यांना  नातेपुते मेडिकल असोसिएशनचे डॉ.दत्तात्रय निटवे,डॉ.आप्पासाहेब वाघमोडे,डॉ.विठ्ठल कवितके व होमिओपॅथीचे डॉ. संदीप महामुनी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.


    यावेळी बोलताना डॉ संदिप महामुनी म्हणाले, कोरोना या आजारावर ठोस उपाय व लस निघे पर्यंत पर्यायी प्रिव्हेंटिव्ह होमिओपॅथी औषध आर्सेनिक अल्बम हे रोग प्रतिकार शक्तीवर्धक म्हणून वापर करावा.

   याप्रसंगी नातेपुते पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री खाडे, पोलीस कर्मचारी, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, अहिंसा सेवा समितीचे संजय गांधी उपस्थित होते.
 
Top