नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर) - राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल, महाराष्ट्र प्रदेश यांचेकडून सोलापूर जिल्ह्यासाठी कोरोना विषाणू निर्मित महामारीच्या विरुद्ध लढण्यासाठी जिल्हा भर राबत असलेल्या डॉक्टर्स, नर्स तसेच अनेक कर्मचारी यांचेसाठी फेस मास्क शिल्ड पाठवण्यात आले आहे.


 ते माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी यांच्यामार्फत नातेपुते, मांडवे,फोंडशिरस,मोरोची येथील ग्रामीण रूग्णालयात  सुपूर्द करण्यात आले.


        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुक्याचे नेते पै.अक्षय भांड,तालुका कार्याध्यक्ष राजकुमार हिवरकर,तालुका संघंटक दादा मुलाणी, रियाज शेख, लखन चांगण आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top