भर उन्हात कर्तव्य बजावणारे भिगवण पोलीस स्टेशनचे PSI रियाज शेख आणि पथकाने प्राण्यास दिले जीवदान*


पोलिसांच्या संवेदनशिल मनाचे पुन्हा घडले दर्शन 


  नातेपुते (श्रीकांत बाविस्कर)-भिगवण परिसरा मध्ये कोरोना अनुषंगाने पीएसआय रियाज शेख,  पोलीस नाईक किरण पांढरे, पो.कॉ. संदीप लोंढे, किरण कदम, नवनाथ भागवत, अक्षय कुंभार चालक एएसआय मोहम्मद अली शेख पेट्रोलिंग करीत असताना राशिन रोडवर कुठल्यातरी गाडीने अपघात झाल्यामुळे एक मांजर बेशुद्धावस्थेत जखमी पडलेले दिसले.सदर पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी लगेच उचलून रोडच्या बाजूला घेऊन त्याचे रक्त पुसून त्यास पाणी पाजले त्यानंतर सदर मांजरीची हालचाल झाल्याने ते तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी श्री.आटोळे यांचे कडे घेऊन जाऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले. 

त्यानंतर सदर मांजर हे पुर्णपणे बरी होऊन फिरत व चालत आहे.डॉ. आटोळे यांनी सदर मांजर ही पूर्णपणे बरी झाल्याचे सांगितल्यानंतर सदर पोलीस पथक हे कोरोना रोगाच्या अनुषंगाने लोकांना सूचना देत आपल्या कर्तव्यावर रवाना झाले. 

   पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने मांजर बरी झाल्याचे डॉ आटोळे यांनी सांगितले.कर्तव्य बजावत असतानासुद्धा पोलिसांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबाबत API जीवन माने यांनी सदर पथकाचे कौतुक केले आहे.
 
Top