नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे निवेदन
जिव्हाळ्याचा प्रश्न हाती घेतल्याने जनतेने केले भरभरून कौतुक

नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर )- नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकारी, अकलूज यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये देशात करोना आजाराची साथ असल्याने लॉकडाऊन चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये जीवनावश्यक वस्तूवरील दर मोठ्या प्रमाणात आकारले जात आहेत अशा तक्रारी जनतेकडून सातत्याने होत असल्यामुळे आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीसने प्रांत अधिकारी यांची भेट घेतली. जनतेला घराच्या जवळ असलेला किराणा मालाच्या दुकानदाराकडून किराणा मालावर वस्तूच्या किमतीच्या दरापेक्षा जास्त आकारणी केली जात आहे तसेच होलसेल किराणा दुकानदार जाणून-बुजून जास्त दराने छोट्या दुकानदारांना माल देत आहेत तसेच मंडईमध्ये भाजीपाला व फळे जास्त दराने विकली जात आहेत . सामान्य जनतेला हाताला काम नाही ,जवळ पैसे नाही अशा परिस्थितीमध्ये होलसेल दुकानदार व पालेभाज्या विक्रेते हे चढ्या भावाने माल विकून जनतेची लूट करत आहेत .त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी प्रशासनाने स्वतः हा बनावट ग्राहक बनून या दुकानदारांवर कारवाई करावी. 
  
  तसेच उज्वला गॅस कनेक्शन सिलेंडर माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात मोफत वितरीत करण्यात यावेत, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या आदेशानुसार सर्व कार्डधारकांना व कार्ड नसणाऱ्यांना मोफत धान्य वितरित करण्यात यावे.गहू काढणारे मशीन मालक शेतकऱ्यांकडून एकरी तीन हजार अशा चढ्या भावाने पैसे घेऊन शेतकर्‍यांची लूट करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, ग्रामपंचायत स्तरावरील १५ टक्के निधी हा वैयक्तिक लाभासाठी दिला जातो तरी तो निधी माळशिरस तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जातीच्या व जमातीच्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वितरित व्हावेत असे आदेश सर्व ग्रामपंचायतींना देण्यात यावेत. शासनाच्या आदेशानुसार गावातील सर्व नागरिकांना धान्य वाटप व्यवस्थित होण्यासाठी ग्रामपातळीवर मौजे तलाठी यांच्या अंतर्गत कोरोना साथीच्या प्रादुर्भावा मुळे राखणे कामी करण्यात येणाऱ्या उपाययोजना गाव पातळीवरील कृती समिती यांच्या कमिट्या तात्काळ कराव्यात. झालेल्या कमिट्यांची माहिती मिळावी रेशन दुकानदार सर्व जनतेला डाळीचे वाटप करत नाहीत त्यांचेवर तात्काळ कारवाई करावी राज्यातील सर्वच आशा कार्यकर्ती आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट मास्क  सुरक्षिततेचे सर्व साहित्य तात्काळ देण्यात यावे तसेच अशा कर्मचारी आरोग्य कर्मचाऱ्यांना पाच लाख विमा देण्यात यावा,अशा मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी शमा पवार यांना देण्यात आले.

   निवेदनावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे प्रांत अधिकारी यांनी सांगितले.निवेदनावर नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते,प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,माळशिरस तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे, राजेश साळे,नवनाथ भागवत यांच्या सह्या आहेत.
 
Top