पंढरपूर - अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर यांच्यावतीने शहराध्यक्ष अमोल पवार यांचा वाढदिवस फळे वाटप करुन साजरा करण्यात आला.


कोरोनाच्या महाकाय संकटात अखिल भारतीय मराठा महासंघाचे पंढरपूर शहराध्यक्ष अमोल पवार यांचा वाढदिवस मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने वाढदिवसाला वायपट खर्च न करता फळे(कलिंगड) वाटप करुन साजरा करण्यात आला.यामध्ये शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन जवळ जवळ ३ टन कलिंगड खरेदी करून शेतकरी बांधवांनाही सहकार्य व फळे वाटप करुन अडचणीतील शेतकरी बांधवांना मदतीचा एक हात हाच उद्देश होता .यावेळी मराठा महासंघ पंढरपूर शहर संघटक काका यादव,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड,मालवाहतूक संघटना अध्यक्ष राहुल यादव हे वाटप करताना मदत करत होते.


 
Top