नाशिक,दि.२०/०४/२०-मित्रांसोबत काल दि. १९एप्रिल,२०२० रोजी साडेपाच वाजता नाशिक येथे शेतमळे परिसरात जॉगिंगसाठी गेलेल्या एका १२ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला.या हल्ल्यात कुणाल योगेश पगारे या मुलाचा जागीच मृत्यू झाला.या घटनेनंतर बिबट्याला पकडण्या साठी शेतमळे परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे.

   यासंदर्भात विधानपरिषद उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वनमंत्री संजय राठोड आणि यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून घटनेतील पीडित कुटूंबास मदत करण्याची सूचना केली. 
  
    याबाबत संजय राठोड यांनी वन अधिकारी नाशिक यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. आज दि.२० एप्रिल रोजी १५ लाख रु या मृत मुलाच्या कुटूंबास दिले जाणार आहेत. यात ३ लाख रु दोन ते तीन दिवसात दिले जातील बाकी १२ लाख निधी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ दिले जातील असे नाशिक डीसीएफ श्री.फुले यांनी कळविले आहे. याबाबत उपसभापती ना.डॉ.गोऱ्हे यांनी तसेच त्यांचे कार्यालय सातत्याने पाठपुरावा करत आहे.
 
Top