ज्यांची मूळ घट्ट खोलवर रुजलेली असतात 
तेंव्हा ती  झाडे खंभीर उभी असतात 
ते धैर्याने तोंड देत गळनार्या पानांचा 
शोक करत नाहीत 
नव्या पानांचं स्वागत करण्यास विसरत नाहीत 
ते परोपकार निंदा नालस्ती विसरतात 
निसर्गाने दिलेलं कर्तव्य पार पडतात 
येणाऱ्या जाणाऱ्या पथिकासाठीं आसरा होतात 
सावली देण्यात सार्थकता मानतात तरीही माणसं  
झाडावर करवत चालवतात 
निर्दयी कसे आहोत हेच दाखवतात 
म्हणूनच झाडं म्हणतात 
आमच्या सारखे परोपकारी नाही झालात तरी माणसानो किमान मारेकरी तरी होवू नका !!

आनंद कोठडीया,जेऊर ,९४०४६९२२००


 
Top