पुणे दि.२४- कोव्हडी-१९ च्या आजारावर उपचार करण्यासाठी राज्यातील सरकारी व महापालिकेचे हॉस्पिटल अहोरात्र झटत आहेत.पुणे महानगर पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ना.डॉ.गोऱ्हे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्याअनुषंगाने स्थानिक आमदार विकास कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत निधीतून कोव्हीड -१९ वैद्यकीय यंत्र सामग्री व साहित्याकरिता निधी देण्याचा निर्णय ना.डॉ.गोऱ्हे यांनी घेतला. पुणे महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये खालील साहित्य  खरेदीसाठी २० लक्ष  निधीची वितरित करण्या बाबत ना.डॉ.गोऱ्हे यांनी त्यांच्या सन २०२०-२१ च्या स्थानिक आमदार निधी कार्यक्रमांतर्गत वीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्याचे प्रशासनास निर्देश दिले. 

या निधीतून  *१. पीपीई युनिटसाठी- दहा लक्ष रु..(१० लक्ष रु), २. इन्फ्रारेड थर्मामिटर करिता-- दोन लक्ष रु.. (२ लक्ष रु), ३. वैद्यकीय कर्मचारी करीता फेस मस्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर--चार लक्ष रु.(४ लक्ष रु), ४. कोरोना टेस्टिंग किट करिता -- चार लक्ष रु.(४ लक्ष रु)*

हे साहित्य पुणे महानगरपालिकेतील हॉस्पिटल साठी खरेदी करण्यात येणार आहे, असे ना.डॉ. गोऱ्हे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे . 

   कोरोनाच्या रूग्णांना उपचार देणार्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी ज्यांना कोरोनाची लागण झालेल्यांना त्यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक तरतुद व्हावी अशी अपेक्षा वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त करण्यात येत आहे.  
 
Top