बारामती - साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे "राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार -२०२०"(प्रकाशित पुस्तके)चे आयोजन केले आहे.

महाराष्ट्रातील प्रतिभावंत लेखक, कवी, साहित्यिकांना राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रकाशित साहित्य पाठवण्याचे आवाहन साहित्य प्रेमी मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

  आपण आपले दर्जेदार कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, नाटक, आत्मकथन, चरित्र, आत्मचरित्र, संशोधन प्रबंध, शोधनिबंध,संपादित, अनुवादित इ. विविध प्रकारातील प्रकाशित साहित्य १५ ऑगस्ट २०२० पर्यंत खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवावे.

* टीप - आपली दर्जेदार साहित्यकृती दोन प्रती सह,आयकार्ड साईज फोटो,संपूर्ण माहिती व पत्तासह खालील पत्त्यावर पाठवावी.

* पुरस्कार स्वरूप - आकर्षक स्मृतिचिन्ह, मानपत्र,शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ

* पत्रव्यवहाराचा पत्ता-
 प्रा. हनुमंत विठ्ठलराव माने संस्थापक अध्यक्ष - साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर
 ता- बारामती जि- पुणे पिन कोड नंबर- ४१२३०६
भ्रमणध्वनी- ९६६५००९७४० (w.p) 
८३२९२५२९६२
 
Top