पंढरपूर -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्यावतीने धार्मिक सामाजिक उत्सव साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२९ वा जयंती महोत्सव सध्याची परिस्थिती लक्षात घेता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यंदाचा जयंती महोत्सव घरात साजरा करण्याचे आव्हान रिपाई युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अँड.किर्तीपाल सर्वगाेड यांनी केले आहे.

    सर्व समाज बांधवांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे घरात पूजन करावे. आपल्या घरात असलेला पंचशील किंवा निळा झेंडा घरावर किंवा बाल्कनीमध्ये फडकवावा, कुणीही घराबाहेर येऊ नये, घरातच बुद्ध व भिम गिते लावावीत.घरात असलेल्या गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले ,डॉ, बाबासाहेब आंबेडकर व परिवर्तनवादी विचारांवर आधारित असलेले पुस्तकांचे वाचन करावे.घरात गोड पदार्थ बनवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

     भीम जयंती निमित्त पूर्वनियोजित असलेले कार्यक्रम रद्द करावेत.केंद्र व महाराष्ट्र सरकारने केलेले आदेशाचे पालन करावे. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन अँड.किर्तीपाल सर्वगाेड यांनी केले आहे.
 
Top