पंढरपूर - राज्यात चर्मकार समाज हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शासनाच्यावतीने लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांचे हातावरचे पोट आहे अशांच्याजवळ असलेला थोडाफार पैसाही संपलेला आहे. हे समाज बांधवमोठ्या संकटात सापडले आहेत.
म्हणून या अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक समाजाला पुन्हा आपल्या पारंपारागत व्यवसाय सुरू करण्या साठी तसेच लाॅकडाऊन काळात झालेल्या आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व कामगारांना किमान १५ हजार रुपयांची आर्थिक मदत कुटूंब प्रमुखांच्या खात्यावर जमा करण्यात यावी,अशी निवेदनाव्दारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी मागणी केली आहे.
 
Top