" *पंढरपुर पॅटर्न* " 
         संपुर्ण जगात कोरोनाची महामारी चालू आहे. ज्या देशांनी कोरोनाकडे दुर्लक्ष केले, त्या विकसीत देशाला कोरोनाने हतबल केले. त्यांनी केलेल्या चुकांचा अभ्यास करुन,आपल्या शासनाने वेळीच महत्त्वाचे निर्णय घेऊन देशाला संजीवनी दिली. प्रशासनाने योग्य निर्णय घेतले.आत्ता प्रशासनाचे आदेश पाळणे हि आपली खुप महत्वाची जबाबदारी आहे. तरच आपला देश, आपला गाव कोरोना मुक्त होऊ शकेल.


     आपल्या देशातील विवीध गावात,राज्यात काही महत्त्वाचे पॅटर्न राबवले गेले, त्यामध्ये त्यांना कोरोनाचा संसंर्ग रोखण्यात यश मिळाले. ते यशस्वी पॅटर्न म्हणजे केरळ पॅटर्न, आग्रा पॅटर्न, भिलवाडा पॅटर्न, बारामती पॅटर्न. या सर्व भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश आले आहे. या सर्व पॅटर्नचा अभ्यास करुन, जेष्ट व जाणकार लोकांच्या मदतीने पंढरपूर पॅटर्न तयार करण्यात आला. 


  जेष्ठ व जाणकार लोकांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करणार आहोत. दि २३ मार्च रोजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या सभागृहात सर्व नगरसेविकांची मिंटीग बोलवली होती. त्यामध्ये बरेच विविध विषयावर चर्चा झाली, विविध मुद्दे सांगण्यात आले.अंमल बजावणीही करण्यात आली. त्या सर्व बाबींचा सुक्ष्म रितीने आभ्यास करुन, तसेच भारतामध्ये विवीध भागात  घेतलेले निर्णयांचा अभ्यास करुन "पंढरपुर पॅटर्न"आरोग्य विभाग व सर्व नगरसेवकांच्या मदतीने आखण्यात आला.  
 
       *पंढरपूर पॅटर्नचा प्रमुख उद्देश* 
     पंढरपूरतील नागरिक, मुले ,जेष्ट मंडळी,माता, भगिनी यांची कोरोनापासून सुरक्षा.

       पंढरपुरात पॅटर्नचे उपनगर भागात अमलात आणत आहे. पुढील काही दिवसात जास्तीत जास्त पंढरपुरात राबवण्याचा प्रयत्न करणार आहे.

 *प्रमुख नियोजन* 

 * नागरिकांना जिवनाश्यक माल व औषधे स्वयंसेवक, नगरसेवक,शासन प्रतिनिधीच्या नियोजनाने घर पोच देण्यात येणार * 

 * अत्यावश्यक वेळी नागरिकांसाठी रिक्षा, अँम्बुलन्सची उपलब्ध करून दिले जाईल * 

 * दक्षता समिती स्थापन करणार * 

 * कम्युनिटी हेल्थ क्लिनिकची स्थापना * 

 * रोटेशन पध्दतीने पुर्ण पंढरपूराचे पंप मशीन व्दारे अत्यावश्यक वेळी ब्लोअर मशीनने निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे , तसेच हॉस्पिटल्स, एटीएमचेही वरचेवर निर्जंतुकीकरण* 

 *आरोग्य सेतु अँप वापरण्यास प्रोत्साहन देणे * 

 * सोशल डिस्टंस ठेऊन रक्ताचा तुटवडा होऊ नये यासाठी रक्तदान करण्यास प्रोत्साहन * 

 * नागरिकांसाठी फिल्डवर काम करणाऱ्या प्रतिनिधींना प्रतिकारशक्ती वाढवणारे होमिओपॅथिक औषधे देण्यात आले * 

 * डॉक्टर वॉट्सअँपव्दारे नियमीत पेशंटची संपर्क, आवश्यकता असल्यास ओपीडीला बोलवतात * 

 * पंढरपुरातील सर्व बाँडरी सिल, बिगरपरवानगी पंढरपूरात येता येणार नाही, कारवाई होणार * 

 * पेट्रोल पंप बंद, फक्त अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या प्रतिनीधी व शासकिय प्रतिनिधींना पेट्रोल मिळणार * 

 * बिगर कामी फिरणाऱ्या व्यक्तींच्या गाडी, वाहन जप्त करत आहेत * 

 * दिलेल्या पासचा गैरवापर किंवा दुसऱ्या कामासाठी वापर केल्यास कारवाई करणार * 

 * नागरिकांच्या संपर्कातील व्यक्ती, स्वयंसेवक , दुकानदार, कर्मचारी, भाजीपाला विक्रेता, शासन प्रतीनिधींची वरचेवर वैद्यकीय तपासणी करण्यात येणार * 

 * पंढरपूरातील सर्व नागरिकांची स्क्रीनिंगव्दारा तपासणी * 

 * सर्व नागरिकांनी घर बसल्या निभावयाचे आपले कर्तव्य - जनजागृती करायची,आपल्या भागात कोणी आजारी असल्यास कळवावे * 

 *नागरिकांच्या,प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानेच मिळेल यश *

 * नागरिकांनी निभवावे आपले कर्तव्य * व
 * प्रशासनाने निभवावी जबाबदारी * 
याची बेरीज म्हणजे *करोनामुक्त पंढरपुर* 
 

 *पंढरपूर पॅटर्न ची रचना* 
पंढरपुरात एकुण १७ वार्ड असुन , एकुण ३४ प्रभाग आहेत, ३४+४ नगरसेवक आहेत. 
 *नगरसेवक* + *नगरपरिषद अधिकारी* + *पोलीस प्रतिनीधी* + *५ समर्पीत स्वयंसेवक* 
अशी टिम तयार करण्यात येत आहे. सर्व लोकांना त्या भागातील सर्व प्रतिनिधीचे, टिमचे नंबर देण्यात आले आहेत. 

 *घरपोच माल व औषधे देण्याची योजना

कोणत्याही नागरिकांला कोणत्याही जिवनाश्यक वस्तुंची आवश्यकता असल्यास त्यांनी घराबाहेर न पडता , स्वयंसेवक , नगरसेवक किंवा शासन प्रतिनीधीला फोन करुन, त्यांना काय हवे आहे हे कळवावे, या भागातील स्वयंसेवकांमार्फत त्या जिवनाश्यक वस्तु, औषधे संबंधीत दुकानातुन घेऊन किंवा जेथे उपलब्ध आहे तेथून घेऊन नागरिकांना पोहचवले जाईल. दुकानदारांच्या बिला प्रमाणे नागरिकांकडून पैसे घेतले जातील. 

       प्रांतअधिकारी सचीन ढोले व डि.वाय.एस.पी. डॉ सागर कवडे ,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनीही पंढरपुरात सर्व भागात जास्तीत जास्त लोकांपर्यंत घरपोच माल मिळण्यासाठी चांगले नियोजन आखले आहे, स्वतःहुन लक्ष देत आहेत.        
        
 *नगरसेवक व शासन प्रतिनिधी यांना स्वयंसेवक निवडणे महत्त्वाचा आहे*

   स्वयंसेवक समर्पित भावनेने काम करणारा असावा. कोणतीही जात, पात,धर्म, पक्ष, संघटना पाहण्यात येणार नाही. व्यक्तीमधील समर्पित भाव बघून निवड करायची आहे.समर्पित स्वयंसेवकाला  बिगर मोबदला नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. समर्पित स्वयंसेवकाला आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. वरचेवर वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. शासनाच्या सुचनेचे पालन करणे आवश्यक आहे. त्याला काहीही मदत लागली तर आम्ही आहोत, सर्व नगरसेवक, शासन प्रतिनीधी, पोलीस प्रतिनिधी त्यांच्या मदतीला येतील. मी या कामासाठी २४ तास स्वतःला गुंतवून घेतले आहे.

 *नागरिकांच्या संपर्कातील प्रतिनीधींची व नागरिकांची वरचेवर वैद्यकीय तपासणी

         जिवनाश्यक वस्तुंचे दुकानदार,कामगार, भाजीपाला विक्रेते, समर्पीत स्वयंसेवक,शासन प्रतीनिधींची वरचेवर वैद्यकीय तपासणी,स्किनींग करण्यात येणार आहे. 

 *पंढरपूरातील सर्व नागरिकांचे स्क्रीनिंग

      पंढरपूरतील सर्व नागरिकांचे घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. कोणी व्यक्ती आजारी असल्यास त्वरीत त्याला उपचारासाठी पाठवले जाईल, संशयितांची विशेष तपासणी केली जाईल.

 * डॉक्टरांचा वॉट्स अँपव्दारे नियमीत पेशंटची संपर्क * 

 पंढरपूरतील बहुसंख्य डॉक्टरांनी नियमीत पेशंट साठी वॉट्स अँप नंबर उपलब्ध करुन दिला आहे. वॉट्सअँप / फोनवर संपर्क सााधून आवश्यकता असेल तरच संपूर्ण सुरक्षीत व काळजी घेऊन डॉक्टरांनी दिलेल्या वेळेत ओपीडीला पेशंटला बोलवण्यात येते. पेशंटच्या वेळेची बचत होईल. पेशंटच्या संपुर्ण परिवाराच्या सुरक्षेसाठी हे महत्वाचे व आवश्यक आहे.

 * दक्षता समिती स्थापन करणार 

      प्रांताधिकारी सचीन ढोले, आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक वार्डमध्ये  दक्षता समिती स्थापन करण्यात येईल.या समिती मध्ये प्रत्येक भागातील जाणकार व्यक्तींचा समावेश असेल.या समितीमार्फत आपल्या भागा तील छोट्या मोठ्या समस्यांची माहिती पोलीस प्रशासनाला आणि शासनाच्या प्रतिनधीला मिळेल व त्यावर उपाययोजना काढता येतील. आपल्या भागातील ज्या व्यक्ती शासनाचे नियम पाळत नाही त्यांना समज देणार आहे .

 * सर्व नागरिकांनी घर बसल्या निभावयाचे आपले कर्तव्य * 

   प्रत्येक नागरिकांनी घरी बसून ,स्वयंसेवक म्हणुन आपले कर्तव्य बजावायचे आहे, आपल्या घरात आणि आपल्या शेजारील घरात राहणाऱ्या नागरिकांपैकी कोणी सर्दी, ताप, खोकला, श्वास घेताना त्रास होत असेल तर त्वरित शासन प्रतिनीधींच्या निर्दशनास आणून देणे आवश्यक आहे. कोरोनाच्या लढाईत सर्व व्यक्तीचे सहकार्य आवश्यक आहे. 

 *नागरिकांच्या सहकार्याने, प्रशासनाच्या प्रयत्नाने आपण आपल्या गावाला वाचवु शकतो* 

आपत्कालीन कक्ष तहसील कार्यालय पंढरपूर ०२१८६ - २२३५५६ , 
नगरपरिषद नंबर १८००२३३१९२३;
०२१८६ -२२३२५३ .

स्वतःचे संरक्षण आणि प्रशासनास सहकार्य केल्यास नक्कीच आपण कोरोना मुक्त होऊ
आणि  *पंढरपूर पॅटर्न यशस्वी करून दाखवू*
 यामुळे *आपला पंढरपूर पॅटर्न राज्यात नव्हे तर देशात आदर्शवत होईल* 


विवेक परदेशी,आरोग्य समिती सभापती
नगरपरिषद पंढरपूर 
पंढरपूर शहरात विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर कोणतीही केस न करता फक्त १५ दिवस काँरन्टाईन पिरियडमध्ये असलेल्या नागरिकांची सेवा करायला पाठवणे गरजेचे आहे. 
 
Top