टेंभुर्णी - दरवर्षी आपण आपल्या गावांमध्ये भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतो. परंतु यावेळेस आलेल्या परिस्थितीमुळे सर्व लोक घरीच होते.अशावेळी आपणाला समाजासाठी काय करता येईल या कल्पनेतुन श्री सन्मती सेवा दल संस्थेने अविरतपणे काम करणारे पोलिस बांधव यांच्या नाष्ट्याची व्यवस्था करण्याचा उपक्रम राबविला.


  अकलूज,माळशिरस,नातेपुते, टेंभुर्णी,करमाळा, दहिगाव, फलटण, भिगवण, सोलापूर, वडूज, पंढरपूर, वेळापूर, जवळा व वैराग या गावांमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बांधवांची नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली.  तसेच रक्तदान शिबिर, धान्य वाटप, अनाथ आश्रम, आश्रम शाळा मध्ये अन्नदान अशा विविध उपक्रमांद्वारे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला.


     श्री सन्मती सेवा दलाच्या उपक्रमाचा भाग म्हणून टेंभुर्णी,ता.माढा येथील कार्यकर्त्यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशन, वरवड टोल नाका, हिंगणगाव पुल ( टेंभुर्णी व इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस बांधव एकत्र ) या ठिकाणची नाष्ट्याची व्यवस्था केली होती .


 
Top