पंढरपूर - करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता तो रोखण्यासाठी पंढरपूर शहरातील नागरिकांना जाहिर आवाहन करणेत येते की, पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्याकरिता बुधवार दि.२२ एप्रिल २०२०, गुरुवार दि.२३ एप्रिल २०२० व शुक्रवार दि.२४ एप्रिल २०२० या तीन दिवसात संपुर्ण शहारातील सर्व दुकाने बंद राहतील.

संपुर्ण जगात व देशात कोरोना व्हायरस या रोगाने थैमान घातले असुन नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सोलापूर शहर येथील वाढते कोरोना सदृष रुग्ण पाहता पंढरपूर शहरा तील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्याकरिता बुधवार दि.२२ एप्रिल २०२०, गुरुवार दि.२३ एप्रिल २०२०, व शुक्रवार दि.२४ एप्रिल २०२० हे तीन दिवस पंढरपूर शहरातील सर्व दुकाने (मेडिकल व हॉस्पिटल सोडून) बंद राहतील. या तीन दिवसात अत्यावश्यक सेवेतील दुध विक्री सेवा सकाळी ७ ते ९ या वेळेतच सुरु राहतील. मेडिकल व हॉस्पिटल सोडून इतर सर्व दुकाने, फळे व भाजीपाला विक्री देखील या दिवशी बंद राहतील.

तरी पंढरपूर शहरातील सर्व व्यावसायिकांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आपली दुकाने बंद ठेवावीत व हे तीन दिवस कोणत्याही नागरीकांनी घराबाहेर पडु नये असे आवाहन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,गटनेते गुरुदास अभ्यंकर, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, सर्व सभापती नगरसेवक व नगरसेविका यांनी केले आहे.
 
Top