मुंबई - राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता वैद्यकीय सेवांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन यांच्या नोंदणीकृत आयुर्वेदिक , होमिओपॅथी , युनानी डॉक्टरांना ‘कोरोना’ उपचारासंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वैद्यकीय व्यवसायी, पदव्युत्तर विद्यार्थी व आंतरवासीयता प्रशिक्षणार्थी यांना एक परिपत्रक काढून याबाबत कळविले आहे ,अशी माहिती मिळाली आहे.  

 येत्या एका आठवड्यात नोंदणीकृत आयुर्वेदिक, होमिओपॅथी,युनानी डॉक्टरांनी ऑनलाईनपद्धतीने ‘कोरोना’संदर्भातील आवश्यक ते प्रशिक्षण घेणे अपेक्षित असल्याची माहिती मिळते.त्यामुळे,येत्या काळात कोणत्याही अडचणी शिवाय नोंदणीकृत आयुर्वेदिक,होमिओपॅथी , युनानी डॉक्टर्सही ‘कोरोना’ रुग्णावर उपचार करू शकतील.

    राज्यातील सद्यस्थिती हाताळण्यासाठी पुरेसा वैद्यकीय स्टाफ तसेच वैद्यकीय सोयी-सुविधा आणि अन्य वैद्यकीय साधने उपलब्ध आहेत. मात्र, राज्यातील वाढता आकडा पाहता येत्या काळात या वैद्यकीय सेवा-सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता पडू नये यासाठी राज्यासाठी सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी, पदव्युत्तर विद्यार्थी व आंतरवासीयता प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना आता कोरोना उपचारासंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 
Top