पंढरपूर,-  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्या साठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असून, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी खाजगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सहभाग महत्वाचा  आहे,अशी  माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

     

 कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच बाह्यरुग्ण तपासणीबाबत खाजगी हॉस्पिटलच्या वतीने देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, हॉस्पिटल मध्ये करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नवीन भक्त निवास पंढरपूर, येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  


  बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले, उपजिल्हा  रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे, न.पाचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर तसेच शहरातील सर्व खाजगी रुग्णालयाचे डॉक्टर उपस्थित होते.

    यावेळी प्रांतधिकारी सचिन ढोले बोलताना म्हणाले,कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी  तसेच उपचाराठी डॉक्टर,परिचारिका चांगल्या प्रकारे  सेवा देत आहेत. तसेच शहरात नगर पालिकेने ठरवून दिलेल्या जागेवरती कम्युनिटी  क्लिनिक सुरु करावेत. या ठिकाणी खाजगी डॉक्टर व कर्मचारी वैद्यकीय सेवा देतील . त्याच बरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय प्रशासनाच्या सूचनेनुसार आवश्यकता भासल्यास  पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड-19 हॉस्पिटलचे रुपांतर करण्यात येईल . रुग्णालयांनी त्यांच्याकडे असणाऱ्या रुग्णवाहिका सुसज्ज ठेवाव्यात तसेच नागकरीकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये असे आवाहनही प्रांतधिकारी ढोले यांनी केले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले   
म्हणाले,कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजने साठी महात्मा ज्योतिराव फुले अंतर्गत असणाऱ्या तसेच इतर हॉस्पिटलनी आपली व्हॅटिलेटरची सुविधा सुसज्ज ठेवावी. पंढरपूर शहरात सुरु करण्यात येणारी कम्युनिटी क्लिनिकसाठी आवश्यकतेनुसार वैद्यकीय सुविधा देण्यात येतील.  

      कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शहरातील सर्व डॉक्टर्स प्रशासनास सहकार्य करतील असे ही आय.एम.ए चे अध्यक्ष डॉ.पंकज गायकवाड यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्र असो अथवा प्रशासकीय क्षेत्र असो ते आपापल्यापरीने कोरोना संकट नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र नागरिकां कडून दुर्लक्ष केले जात आहे . ही यंंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे .नागरिक काही तरी निमित्त करून घराबाहेर पडत आहेत. ही बााब चिंताजनक आहे.  
 
Top