पंढरपूर ,(प्रशांत माळवदे) - पंढरपूर तालुक्या तील भाळवणी येथील ग्रामपंचायत व कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठीची ग्रामस्तरीय समिती आणि वरिष्ठांनी केलेल्या सूचनेनुसार मंगळवार व बुधवार हे दोन दिवस जनता कर्फ्युचे आवाहन करण्यात आले होते, या आवाहनास जनतेने शंभर टक्के प्रतिसाद दिला.


यावेळी बाजारपेठेतील किराणा दुकान,शेती सेवा केंद्र, पिठाची गिरणी,अशी विविध प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आले होती.मेडिकल व दवाखाने यांना या बंदमधून वगळण्यात आले होते.भाळवणी ग्रामस्थांनी या बंदमध्ये सहभाग घेऊन शंभर टक्के प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार तसेच यापुढे ही सर्वांनी लॉक डाउन विषयी माहिती व सूचना पाळाव्यात असे आवाहन तलाठी विजय शिवशरण यांनी केले आहे.

यावेळी सरपंच सौ शिंदे ,ग्रामसेवक पी.बी.कुंभार आदी उपस्थित होते. गावकर्‍यांनी तालुका पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे आणि त्यांचे सर्व सहकारी, भाळवणी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.

भाळवणी येथे टीसीएल पावडरची फवारणी मशिनद्वारे करण्यात आली.
 
Top