खर्डी ,(अमोल कुलकर्णी)- जगभरात कोरोना सारख्या रोगाने थैमान घातलेले असताना देशातील लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने,व्यवहार,प्रवास ठप्प आहेत.अशी परिस्थिती असतानाच खर्डी येथील खासगी व्यापारी संकुलातील सहा गाळे चोरट्यांनी फोडल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातरवरण निर्माण झाले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की पंढरपूर सांगोला महामार्गावरील खर्डी, ता. पंढरपूर येथे ज्ञानोबा दशरथ रोंगे यांच्या व्यापारी संकुलातील गाळ्या पैकी काल मध्यरात्रीच्या सुमारास सहा गाळे चोरट्यांनी मागील बाजूने कटरच्या साह्याने पत्रा उचकटून फोडले आहेत व दुकानातील सामान, काही वस्तू व रोख रकमेसह डल्ला मारला आहे. यामध्ये रत्नदीप कृषी केंद्र,मकर बेकरी, डी.एस. शूज यासह तीन गाळे फोडले आहेत. सरपंच रमेश हाके यांच्याही गाळ्याचा पत्रा उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती वाघमारे सर यांनी दुकान उघडले असता चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी लगेच तालुका पोलिस स्टेशनला कळविली.


रात्री दुकान फोडल्याचे सकाळी लक्षात आले.रोख रक्कम आणि चप्पल जोड्या आणि शैक्षणिक साहित्य चोरीसह सी.सी. टी.व्ही.कॅमेरा ही नेला आहे            - दिनेश आगावणे
आमचे कृषी औषधांचे दुकान आहे रोख रक्कम आणि चांदीची मूर्ती चोरीला गेली आहे - तानाजी हाके
 सदर चोरी प्रकरणी पंढरपूर उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे, तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली घटना स्थळावर हाताचे ठसे घेण्यात आले असून तपास अधिकारी प्रकाश इंगोले,पोलीस नाईक शिंदे यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे.गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.
 
Top