पंढरपूर - लाँकडाऊनकाळात संचारबंदी सुरु आहे फक्त अत्यावश्यक सेवा सुरु असल्याने अनेक कुटुंबांना पोटापाण्याची चिंता भेडसावत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे कामगारवर्गाचे अतोनात हाल होत आहेत.


कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्शभुमीवर शहरातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसह मजुरांची उपासमार होऊ नये यासाठी पंढरपूर शहर पोलीस ठाणे आणि दाऊदी बोहरा समाजाच्यावतीने येथील शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार आणि दाऊदी बोहरा समाजाचे प्रतिष्ठीत यांच्या हस्ते १५० कुटुंबांना १० दिवस पुरेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सोशल डिस्टनिंग ठेवून करण्यात आले.


यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,लाँकडाऊन काळात घरातच सुरक्षित थांबण्याचे आवाहन केले.


 
Top