पंढरपूर - आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत आहेत व १३ दिवसात ५ कोटीहुन जास्त लोकांनी आरोग्य सेतु अँप डॉउनलोड केला आहे .       
       
     चिन,साऊथ कोरिया,सिंगापूर या देशातील नागरिकांना व प्रशासनाला अशा अँपच्या माध्यमा तून कोवीड १९ पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यासाठी खुप मोलाची मदत झाली, यामुळे तेथील परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत झाली. हा अँप अँड्रॉईड मोबाईलमध्ये प्लेस्टोअरमध्ये व अँपल मोबाईल मध्ये आरोग्य सेतू नावाने उपलब्ध आहे किंवा खाली दिलेल्या लिंकच्या मदतीने सदर अँप डॉउनलोड करता येतो. या अँपचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देशातील विविध ११ भाषामध्ये या अँप वर माहिती भरता येते, मिळवता येते. सुरवातीला ओटीपी नंबर वेरीफाय करुन नंतर जिपीयस ब्लुटुथची परमिशन देऊन या अँपच्या प्रमुख कार्याला सुरुवात होते. या अँपमध्ये आपणास आपल्या मागील महिन्याची प्रवास हिस्ट्री व साधी सोपी प्रश्र्न विचारली जातात, सर्व  माहिती खरोखर भरायची आहे व शेवटी आपण किती रिस्कमध्ये आहोत, सुरक्षित आहोत यांची माहिती रिझल्ट रूपाने दिली जाते. आपण सुरक्षित आहोत किंवा आपणास सेल्फक्वारंटाईनमध्ये रहायला पाहिजे असे विविध रिझल्ट मिळतात.            


        घराबाहेर पडताना आपल्या मोबाईलाचे जिपीयस,ब्लूटूथ ऑन ठेवणे गरजेचे आहे. आपण कोठेही फिरत असताना आपल्या संपर्कात कोण कोण आले व आपण कोणा कोणाच्या संपर्कात होतो याची माहिती या अँपमध्ये स्टोअर राहते. जर कोरोनाबाधीत व्यक्तींच्या संपर्कात आपण आल्यास आपणास मोलाईलवर मेसेज येतो. जर समजा आज आपण एका व्यक्तीच्या संपर्कात आलो व पुढे काही दिवसानंतर कळाले हा व्यक्ती कोवीड १९ पॉझिटिव्ह आहे. तर आपणास लगेच या अँपच्या मदतीने माहिती मिळते व मेसेज येतो. सदर व्यक्ती मागील दिवसामध्ये कोणा कोणाच्या संपर्कात होता, त्या सर्व लोकांना या संदर्भात मेसेज जातो व शासकीय यंत्रणेलाही गाईड लाईन मिळतात व शासन आपल्या सुरक्षेसाठी उपाय योजना करते, हाच सर्वात महत्त्वाचा फायदा या अँपचा आहे. 
   
        
    या अँपचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या कोरोना संदर्भातील नवनवीन सुचना,अपडेट आपणास मिळतात, कोवीड १९ चे आपल्या पुर्ण देशाचा करेक्ट तपशील , माहित आपणास कळते. सर्व राज्यातील हेल्पलाईन नंबर या अँप माध्यमा तून आपणास मिळतात. आपण प्रवास करत असताना ज्या ठिकाणाहून आपण जात आहे त्या भागात कोरोनाचा हॉटस्पॉट झोन असेल तर आपणास दुसऱ्या रस्त्याने जाण्याची सुचना या अँपच्या माध्यमातून मिळते. याचा आपणास उपयोग होतो.

  या अँपच्या माध्यमातून आपणास कोवीड १९ पासुन यशस्वीपणे लढता येईल,घरबसल्या प्रशासनाला मदत  करता येईल. जास्तीत जास्त लोकांनी हे अँप इंस्टॉल करून, माहिती भरुन प्रशासनाला मदत करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्यक्तीने ४० नागरिकांच्या मोबाईल मध्ये हे अँप ईंस्टाँल करुन, नागरिकांची माहिती भरावी असे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर २४ तासात १ कोटी १० लाख लोकांनी सदर अँप डॉउनलोड केले. आपले आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही हे अँप डॉउनलोड करा असे आवाहन केले आहे .

       मी आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, नगरपरिषद पंढरपूरच्यावतीने आपणास आवाहन करतो की ,भारत सरकारने कोरोना विरुद्धची लढाई सोपी होण्यासाठी आरोग्य सेतू अँप तयार केला असून आपण आपल्या,आपल्या मित्र परिवारांच्या,सर्व नागरिकांच्या मोबाईलमध्ये अँप डाउनलोड करुन शासनाला मदत करावी ही नम्र विनंती.
 
Top