पंढरपूर शहरातील सर्व नागरीकांचा सर्व्ह करण्यात आला त्यामध्ये बाहेरच्या गावावरून १४०० लोक आले होते.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. तरी सुध्दा अजूनही बाहेरहून लोक येत असल्याचे निदर्शनास येत आहे.सदरची बाब ही शहराचे आरोग्याचे दृष्टीने अतिशय गंभीर स्वरुपाची आहे, कारण शहरातील सर्व नागरिक यांनी लॉकडाऊन काळात अतिशय संयम स्वयंशिस्त पाळत घरात राहून कोरोनाला आपल्या शहरात येण्यापासून रोखले आहे. पण  काही लोक अजूनही आपल्या पै पाहुणे नातेवाईक यांना आपल्या घरात आश्रय देत आहेत तरी आज पासून शहरात प्रवेश बंदी असताना विना परवाना कोणी प्रवेश केल्यास त्या व्यक्ती विरुद्ध व ज्यांनी त्यांना घरात आश्रय दिला आहे त्या नागरिका विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही नागरिकांनी बाहेरच्या व्यक्तीना आपल्या घरात प्रवेश देऊ नये असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचेवतीने करण्यात आले आहे.
 
Top