सोलापूर - भारतीय जैन संघटना व सोलापूर जिल्हा प्रशासना तर्फे "डॉक्टर आपल्या दारी", या सेवेअंतर्गत जेष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी डॉक्टर मोबाईल व्हँन घेऊन आपल्या घरी येतील व तपासून योग्य ते औषध असल्यास देतील किंवा लिहून देतील ही सेवा विनामूल्य ४ दिवसापासून सोलापूर शहर हद्दीत सुरू केली आहे.


ह्या मध्ये आपण फक्त खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर फोन करावयाचा आहे .वेळ व ठिकाण - सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेपर्यन्त शहरातील सर्व पेठा व गावठण भाग व दुपारी ०२ ते सायंकाळी०६ वाजेपर्यन्त जुळे सोलापूर भाग,तरी गरजुनी संपर्क करावा.

लॉकडाउनमध्ये रुग्णांना कोणतेही वाहन व डॉक्टर मिळत नसल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सहकार्याच्या भावनेने महाराष्ट्रभर १०० अँम्ब्युलन्सद्वारा ही सेवा आम्ही विविध गावात चालू करत आहोत,ह्या सेवे मध्ये स्वेच्छेने डॉक्टर रोज ४ तास सेवा देण्यास इच्छुक असतील तरी त्यांनीसुद्धा खालील नंबर वर संपर्क करावा अशी विनंती केतनभाई शहा, राज्य उपाध्यक्ष ,भारतीय जैन संघटना यांनी केली आहे.

तरी गरजूंनी अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक, शाम पाटील,सोलापूर मो.नं. ८९९९९०८६६०
 
Top