पंढरपूर,(विजय काळे)-तालुक्यातील मौजे भोसे (क) येथे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जानुबाईदेवी,गायकवाड साहेब व मलिक साहेब यांचे यात्रेचा उत्सव कोरोना संकटा मुळे रद्द करण्याचा निर्णय समितीने मिटिंगमध्ये घेतला असून याबाबत सर्व ग्रामस्थांना कळविण्यात आले आहे.

   सध्या देशावर आलेल्या कोरोना व्हायरस संकटामुळे एक सामाजिक जबाबदारी म्हणून राजुबापु पाटील यांचे अध्यक्षतेखाली भोसे (क) येथे मिटींग होवून त्यामध्ये भोसे येथे गुरूवार दिनांक ०७/०५/२०२० ते शनिवार दिनांक ०९/०५/२०२० रोजी होणारी जानुबाई देवी , गायकवाड साहेब , मलिकसाहेब यांची यात्रा रद्द करण्याचा व यात्रेतील सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे. तरी सदर दिवशी मंदीर बंद असलेने कोणीही भाविकांनी दर्शनासाठी किंवा नैवेद्य दाखविण्यासाठी मंदीराकडे येवु नये. तसेच ग्रामस्थांना आपल्या नातेवाईकांना संपर्क करून यात्रेस न येणेबाबत कळवावे कारण त्यादिवशी बाहेरून येणाऱ्यांसाठी गावबंद राहणार आहे. तसेच पोलिस बंदोबस्त असल्याने गुन्हे दाखल होवु शकतात यांची सर्व भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन राजुबापु पाटील यांनी केले आहे.
 
Top