*महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाच्या ह्रदयात - मनात...*
*अन् त्यांची भिम जयंती आपल्या घरात...*

पंढरपूर - सोलापूर ग्रामीण पोलीसच्या पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व २४ गावातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की,
दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे.
सध्या संपूर्ण जगात, देशात व राज्यात कोरोना विषाणूने प्रकोप केला असून अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.कोरोना विषाणू संसर्ग व प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्हा अधिकारी मिलींद शंभरकर, सोलापूर यांनी त्यांचे कडील आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात सध्या यात्रा, जत्रा, जयंती उत्सव मिरवणूक, वाढदिवस, लग्न समारंभ, सार्वजनिक पूजा, नमाज, धार्मिक विधी कार्यक्रम, बाजार असे गर्दी होणारे कार्यक्रमा करीता बंदी घालणेत आली आहे व सध्या संचारबंदी आदेश लागू आहे.

त्यामुळे दिनांक १४ एप्रिल २०२० रोजीची भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती आपआपले घरात प्रतिमा अथवा मुर्ती पूजा करून साजरी करावी. महापुरूषाला अभिवादन करावे.
जयंती उत्सव साजरा करणेसाठी कोणीही कुठे एकत्रित जमू नये.बुध्द विहार, समाज मंदिर, हाॅल, खाजगी कार्यालय, बहुउददेशीय सभागृहात अथवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून जयंती उत्सव निमीत्ताने  पूजा करून अभिवादन करताना आढळून आलेस त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

   तेव्हा सर्व नागरिकांनी व भिम अनुयायी, भीमप्रेमी, भीम सेवक यांनी भिमजयंती आपल्या घरात साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे.कोणी ही नियम व कायदा भंग करू नये ही विनंती आहे.कोरोना विषाणू मुक्त सोलापूर जिल्हा साठी आपले योगदान द्यावे.आणि हेच आपले कोरोनाच्या लढ्यासाठी व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरे अभिवादन असेल तसेच *Stay Home*  *Stay Safe*
*मास्क वापरा,घरी राहा,नेहमी हात स्वच्छ धुवा,घरातील सर्वांची काळजी घ्या असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे,पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन ,पंढरपूर यांनी केले आहे. 
 
Top