पंढरपूर - कोरोनाची महामारी पुर्ण जगात चालू आहे, आपले प्रशासन खुप चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळत आहे. पंढरपूर पॅटर्न चांगल्या प्रकारे राबवला जात आहे. नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आपले घर हेच कोरोनापासुन बचावाचे उत्तम ठिकाण आहे हे नागरिकांनाही कळू लागले आहे. डॉक्टर लोक देवदुताप्रमाणे काम करत आहे. नगरपरिषदेच्या दवाखान्यात पिपीईकिट संपत आल्याचे समजताच इनरव्हील क्लब पंढरपूरकडून २० पिपीई किट व ए९५ मास्क देण्यात आले. रोटेरियन किशोर निकते यांनी होलसेल किमतीत तसेच चांगल्या क्यलिटीचे किटस व मास्क उपलब्ध करून दिले. तसेच नगर परिषद संचलीत बेघर येथे १८० ते २०० लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे, या लोकांची मदत करता यावी यासाठी इनरव्हील संस्थेच्या वतीने धान्य देण्यात आले. इनरव्हील सदस्यांकडून वृद्धाश्रमात दररोज भाजीपाला देण्यात येत आहे, गरवंताना धान्य देण्यात आले,आंबे देण्यात आले, पोलीस प्रतिनिधींना सॅनिटायझर देण्यात आले, काही सदस्यांकडून रॉबिनहुड आर्मीला दररोज जेवण पाकीटे देण्यात येतात.
   
        
     संस्थेच्या अध्यक्षा हेमा पत्की, सचिवा शमिका केसकर,नगिना बोहरी,मीरा परिचारक,अमृता दोशी, गिता बेंगलोरकर, सूदेश वोरा, सुजाता यादगिरी, रश्मी कौलवार, संगीता काळे, आशा मर्दा, प्रांजल शहा, निलांबरी मागजी, साधना उत्पात, विद्या हजारे, सीमा कुलकर्णी, उज्वला विरधे, स्वाती लाड, शीतल नायर, प्रीती वाघ, राजश्री देशपांडे, डॉ अश्वीनी परदेशी यांनी पिपीई किट व धान्य उपलब्ध करून दिले आहे .       
         
     नागरिंकामधील नेमकी गरज शोधून त्यांना ते पुरवण्याचे काम इनरव्हील संस्थेने केले. जेथे गरज आहे तेथे श्रमदान केले, मार्गदर्शन केले, वैद्यकीय मदत,औषध उपचार व सेवा पुरवली. 

      मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या आवाहनाला मदतीची हाक देत इनरव्हील संस्थेने माऊली बेघर निवाससाठी नगरपरिषदेकडे शिधा सुपूर्द केला.            
            
   सदर प्रसंगी मुख्याधिकारी,वैद्यकीय अधिकारी बजरंग धोत्रे, प्रितम येळे,रा.पा.कटेकर,आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी इनरव्हील संस्थेचे आभार मानले. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सांगितले की, कठीण प्रसंगी नेहमीच इनरव्हील संस्थेचे योगदान असते, पंढरपूराला महापुरानी वेढले होते अशा वेळीही इनरव्हील संस्थेने मोलाची मदत केली होती. कोरोनाच्या कठीण प्रसंगातुन सावरण्यासाठी सर्वांचे हातभार लागल्यास निश्चितच सर्व गरजू पर्यंत आवश्यक ती मदत पोहचेल असे सांगितले.
            
    इनरव्हील संस्थेच्यावतीने आवाहन करण्यात आले, शासनाचे आदेश पाळा व डॉक्टर, पोलीस , आरोग्य विभागातील कर्मचारी, शासनाच्या प्रतिनिधींना सहकार्य करा , लोकसहकार्यानेच कोरोना विरुद्धचा लढा सोपा होईल.
 
Top