सारनाथ पोलीस ठाणे परिसरातील आशापूर पोलीस चौकीच्या जवळ चौकात काही लोक विनाकारण बाहेर रस्त्यावर निघाले तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडून शिक्कामोर्तब केले.
यासंदर्भात सारनाथ पोलिस स्टेशनचे एसएचओ विजय बहादुर सिंह म्हणाले की, सकाळी ११ नंतर विनाकारण फिरणाऱ्यांना समजावून सांगितले जात आहे आणि जागरूकही केले आहे. याशिवाय त्यांच्या हातावर शिक्का देखील मारला जात आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हावी आणि जेव्हा ते आपल्या कुटूंबात आणि परिसरात जातील तेव्हा बाकीचे लोकही शिक्का पाहून सावध होतील.
असाच काहीसा प्रकार आपल्याकडे करावा म्हणजे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पोलीस कर्मचारी यांना ओळखणे सोपे जाईल. हा प्रकार थोडासा माणुसकी सोडून असलेला वाटेल परंतु या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आहे याचा विचार पोलिस प्रशासनाकडून आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडून केला जावा कारण फक्त घरात राहत कोरोनाला परतवून लावण्याचा सोपा उपाय असताना सर्व सरकारी यंत्रणा काही लोकांमुळे अडचणीत सापडली असून त्यांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.