सर्व हल्लेखोर तुरुंगात,सीयडी कसून तपास करीत आहेत                                - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि२० एप्रिल २०२० - पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी याठिकाणी धाव घेत दिवसभरात १०० पेक्षा जास्त लोकांना पकडले , त्यात ९ अल्पवयीन मुले असून त्यांना रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे. उर्वरित हल्लेखोर तुरुंगात असून अतिशय कठोर कारवाई करणार आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

दोन पोलीस कर्मचाऱ्यांना याप्रकरणी निलंबितही केले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, माझे गृहमंत्री त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बोलणे झाले आहे. या ठिकाणी कुठलाही धार्मिक संदर्भ नाही तसेच जातीय वळण देणे अतिशय चुकीचे आहे असे आपण त्यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

      पोलिसांवरदेखील या जमावाने हल्ला केला तसेच त्यांच्या वाहनांची नासधूस केली असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 
Top